पुणे: बारामती पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू झाला असताना दुसरीकडे पुणे महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या हातातून महत्त्वाची संधी प्रशासनाकडून गेली आहे. त्यावरून आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
पुणे महानगरपालिकेतील क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या पुनर्रचनेवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. महापालिका प्रशासनाने प्रभाग समित्यांची केलेली ही नवी रचना राजकीय हेतूने प्रेरित आणि दोषपूर्ण असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगरविकास विभागाकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
पुणे महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनाकडून १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली होती. मात्र, या नव्या रचनेमुळे भारतीय जनता पक्षाचे १४ प्रभाग समित्यांवर वर्चस्व निर्माण होणार आहे, तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ एक समिती येणार आहे. महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) एकाही प्रभाग समितीवर संधी मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
पुनर्निर्मित करण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालयांची रचना भौगोलिकदृष्ट्या चुकीची असून यामुळे सामान्य नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप करून राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा मुद्दा महत्त्वाचा असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका प्रशासनाला या पुनर्रचनेबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने हा निर्णय घेताना कोणते निकष लावले, याची चौकशी आता नगरविकास विभागामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात ही पुनर्रचना रद्द होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित पवार यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य; पक्की माहिती शिकार होणार…
राजकीय वर्तुळात खळबळ! सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका…