मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी अद्ययावत ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार असून, या नव्या प्रणालीमुळे वैद्यकीय मदतीसाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया अवघ्या ८ तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
नव्या व्यवस्थेनुसार रुग्णाला स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज राहणार नाही. संबंधित रुग्णालयच रुग्णाची कागदपत्रे तपासून अर्ज थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठवणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. रुग्णालयात आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया प्रशासनाच्या माध्यमातून पार पडणार असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ कमी होईल.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगवान होणार आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण आणि नियमांनुसार असल्यास केवळ ८ तासांत मंजुरी दिली जाणार आहे. यामुळे गंभीर रुग्णांना तातडीने आर्थिक मदत मिळून उपचारांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय, मदत कक्षामध्ये रुग्णस्नेही बदल करण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि विलंब टाळता येईल. रुग्णालय प्रशासन, मदत कक्ष आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार असल्याने सेवा अधिक सक्षम होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ही प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी नागरिकांना १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे वैद्यकीय मदत मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! महसूल अधिकाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर…