अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना पहिला धक्का…

rupali-chakankar
Share

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळाशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी अधिकृत नोटीस बजावली आहे. समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली असून, त्यांना चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.

अशोक खरात विरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारी आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान पोलिसांना ‘समता पतसंस्थेत’ खरातशी संबंधित अनेक संशयास्पद खाती आढळली आहेत. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे या पतसंस्थेत एकूण 4 खाती आहेत. या खात्यांवरून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या आर्थिक व्यवहारांचा खरातच्या सावकारी व्यवसायाशी काय संबंध आहे? हे पैसे कोणाचे आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या उपलब्ध असलेल्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर पोस्टाद्वारे ही नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यापासून 5 दिवसांच्या आत त्यांना चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 33 खातेदारांचे जबाब नोंदवले असून, चाकणकर यांचा जबाब या तपासातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

दरम्यान, एसआयटीने (SIT) अशोक खरातला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी आता तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, प्रसूती सुलभ व्हावी आणि मुलगा व्हावा, असे आमिष दाखवून एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना चौकशीला कधी बोलवणार…

खळबळजनक आरोप! रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याला 177 कॉल्स…

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकर यांची बहिण अन्…

अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या…

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *