अजित पवार यांच्या घातपाताचा संशय! राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग…

ajit-pawar-plane-crash
Share

मुंबईः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर या संपूर्ण घटनेभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी, नागरी उड्डाण संचलनालय (डीजीसीए) यांच्यावर गंभीर आरोप केले असून अजितदादांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय वारंवार बोलून दाखवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आमदार बुधवारी रात्री देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना भेटायला गेले होते. या भेटीत सुनेत्रा पवार आणि या आमदारांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या सुरु असलेल्या या हालचालींची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. बैठकीत राष्ट्रवादीच्या संबंधित आमदारांनी डीजीसीएने अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सादर केलेल्या अहवालाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या. सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या विमान अपघाताची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून चौकशी व्हावी, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या मागणीचे काय झाले, याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करावी, असे राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यावर सुनेत्रा पवार यांनी आपण लवकरच सगळे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सांगितल्याचे समजते.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांनी डीजीसीएने अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सादर केलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे सुनेत्रा पवार यांना सांगितले. या अहवालाबाबत अनेक प्रश्न आणि शंका या आमदारांनी कालच्या बैठकीत उपस्थित केल्या. सुनेत्रा पवार यांनी देवगिरीवर आलेल्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याचेही समजते. या स्वतंत्र भेटीत आमदारांनी सुनेत्रा पवार यांना नेमकं काय-काय सांगितलं, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

सुनेत्रा पवार यांनी कालच्या बैठकीवेळी देवगिरी बंगल्यावर आलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू सगळ्यांना दाखवल्या. यामध्ये अजित पवार यांची चप्पल आणि घड्याळाचा समावेश आहे. त्या अनुषंगानेही सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे देवगिरी बंगल्यावरील सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.

रोहित पवार यांच्याकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड; विमानाची रेकी…

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…

अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…

अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *