अजितदादा विमान अपघात! छगन भुजबळांची शंका; म्हणाले, मलाही आश्चर्य वाटलं की…

chhagan-bhujbal
Share

नाशिक: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. या प्रकरणी 28 फेब्रुवारीला एएआयबीचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर झाला. अहवालानुसार, लँडिंगच्या वेळी विमान प्रथम एका झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले. एएआयबीच्या अहवालावर अनेक नेत्यांनी शंका व्यक्त केली होती.

अजित पवार यांच्या अपघाताविषयी एएआयबीच्या रिपोर्टवर छगन भुजबळ यांनीही शंका व्यक्त केली आहे. अजित पवार यांचे विमान आधी झाडावर आदळलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालेलं दिसलं असतं. विमान झाडावर पडल्याचं कोणी पाहिलेले नाही. विमान हवेत कलले होते आणि कोसळले, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसून येत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

एएआयबीच्या रिपोर्टबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही तिथे गेलो, तेव्हा तिथे आम्हाला कोणीही झाड विमानावर आदळल्याचे सांगितले नाही. विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते. कोणीही असे म्हणत नाही की, विमान झाडावर आदळले. मला देखील आश्चर्य वाटले की, कुठल्या झाडावर विमान आदळले. तिथे एकही मनुष्य असा भेटला नाही की, तो विमान झाडाला आदळल्याचे सांगत होता. विमान झाडाला आदळले असेल तर झाडाचे नुकसान झाले असते, असे म्हणत त्यांनी एएआयबीच्या अहवालावर शंका उपस्थित केली.

दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, तो व्हिडीओ अजितदादांच्या विमानातील नाही. मालक त्यात असता तर ठार झाला असता. पण ते चुकीचे आहे. फक्त पायलटच त्या सीटवर बसू शकतो. मालक झोपला असेल तर निष्काळजीपणा आणि मुजोरपणा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…

अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…

अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *