मुंबईः ‘चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे.” हा संदेश ते कोणाला देतायत? कोर्टाला धमकावणी देत आहात का? का अमित शाहांना देतायत? अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मागे असं होतं की हे मिंधे जायचे तेव्हा ते त्यांच्या शाहसेनेच्या प्रमुखाला भेटायचे. आता शाहसेनेच्या प्रमुखाला भेटायची त्यांना गरज नाही, कारण त्यांचा आता बहुतेक बॉस बदललाय. आता ते थेट मोदींना भेटतात. आणि विशेष म्हणजे शाह इकडे असताना ते मोदींना भेटतायत. “भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे” ही धमकीवजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिलाय का? की अमित शाहांना दिला आहे? की फडणवीसांना दिला आहे? की प्रशासनाला दिलेला आहे? नक्की कोणाला दिलेला आहे? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएम मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत मोदी यांनी भिऊ नको, मी तुमच्या पाठिशी असल्याचे सांगितले होते. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरु असताना शिंदे दिल्लीत पोहोचल्याने राजकीय भूवया उंचावल्या होत्या. या भेटीवर आता उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
आमच्या केसची सुनावणी सुरू असताना, जे पंतप्रधान Gen Z ना नाही भेटले, ते पंतप्रधान गद्दारांना भेटतायत, गद्दारांना भेटतायत आणि गद्दारांना सांगतायत की ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे.’ हे फार आक्षेपार्ह आहे आणि याची दखल आम्ही तर घेतोच आहोत, जनतेने घेतली पाहिजे, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली पाहिजे आणि विचारलं पाहिजे की, हे नेमकं तुम्ही कोणाला बोललेला आहात?”उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, भिऊ नका हा संदेश इतर पक्षातील होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का? की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी आहे. बघूया तुमचा ‘आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूँ.’ तर असा हा संदेश किंवा ही धमकी मोदींनी कोणाला नक्की दिलीय? याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
लढाई ही केवळ आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय. तर लोकशाहीबद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, त्या तमाम कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की, तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे. देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य हे आपल्याला करावं लागणार. देशातला तरुण तर त्याचं तर आता माथं भडकलंय. त्यांच्याबरोबर आता यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांचं प्रवचन ऐकायला तयार नाहीत. म्हणूनच ही गोष्ट गंभीर आहे. ही आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास नक्की आणून देणार आहे. पण मोदींनी सांगायला पाहिजे की हा धमकीवजा संदेश तुम्ही नेमका कोणाला दिलाय? आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंगमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा का घाबरून तुमची पळापळ का होतेय? का शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे जाताय? अशा शब्दात ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
CJP ! कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पाहा नावे…
फडणवीस सरकारचा Gen Z साठी डॅमेज कंट्रोल प्लॅन तयार; पाहा प्लॅन…