CJP ! कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पाहा नावे…

Cockroach-Janta-Party
Share

मुंबई : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सुनावणीतील एका टिप्पणीचा आधार घेत अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली होती. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवर कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडल्सला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिजीत दिपके भारतात आले होते.

दिपके यांनी महिनाभराच्या आंदोलनानंतर सीजेपीच्या पुढाकारानं सुरु झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि नीट पेपरफुटीच्या मुद्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला. अभिजीत दिपके यांनी त्यानंतर सीजेपी दबाव गट म्हणून कार्य करेल, असं जाहीर केले होते. गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांच्या घरी सीजेपीची बैठक सुरु होती. अभिजीत दिपके यांनी क्या बोलती पब्लिक हा कार्यक्रम जाहीर केला असून तो सप्टेंबर महिन्यात राबवण्यात येणार आहे. सीजेपीकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. सीजेपीचे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक पद अभिजीत दिपके यांच्याकडे असेल.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

कॉकरोच जनता पार्टीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक : अभिजीत दिपके
सह संयोजक : आशुतोष रांका, सौरव दास
राष्ट्रीय संघटना प्रभारी : अजिंक्य शिंदे
संघटना सह प्रभारी : दीपक बलियान
राष्ट्रीय सचिव : अफ्रीन नवाज
मीडिया प्रमुख : विजय रेड्ड मलंगी
कायदेविषयक घडामोडी प्रमुख : रत्ना सिंग
रिसर्च अँड पॉलिसी लीड : वैष्णवी गौर
टेक्नोलॉजी लीड : रोहन देशपांडे
फायनान्स लीड : योगेश इंगळे

विभागीय प्रमुख
उत्तर विभाग : दीपक बलियान
दक्षिण विभाग : विजय रेड्डी मलंगी
पूर्व आणि ईशान विभाग : अंकित भारद्वाज
पश्चिम विभाग : योगेश इंगळे

अभिजीत दिपके यांनी सीजेपीच्या सहकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, जे सरकार बोलत होतं या सरकारमध्ये राजीनामा होत नाही. जेन झीने त्यांना झुकवलं. या आंदोलनाने ज्या सरकारला लोक इतकी वर्षे घाबरून होती, त्यांची भीती गेली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा सर्वात मोठा विजय नाही, लोकांच्या मनातील भीती संपली, हे मोठं यश आहे. नागरीक सरकारला प्रश्न विचारतील, वेळ पडल्यास रस्त्यावर येतील.

कॉकरोच जनता पार्टी सप्टेंबर महिन्यात एक देशव्यापी क्या बोलती पब्लिक… हे कॅम्पेन राबवणार आहे., आम्ही देशभरात दौरा करुन जनतेच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेणार आहोत, असेही दिपके म्हणाले.

CJP आंदोलकांचा मोठा विजय! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा…

धोक्याचा इशारा! कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांचा नवा Video व्हायरल…

Video: कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप; दगडांनी भरलेला डम्पर अन्…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *