मोठी बातमी! भाजपमध्ये गेलेले आपचे सर्व खासदार होणार अपात्र…

Arvind-Kejriwal
Share

नवी दिल्ली: आपच्या राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ‘आप’चे राज्यसभा प्रतोद या तिन्ही खासदारांविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. भाजपमध्ये गेलेले आपचे सर्व खासदार अपात्र ठरणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खासदार राघव चढ्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी (ता. 24) पत्रकार परिषद घेत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. त्यांच्यासोबतच हरभजन सिंग, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ताही आपला रामराम ठोकणार असल्याचं चढ्ढा यांनी जाहीर केले. तसेच आपची साथ सोडतानाच राज्यसभेत आम आदमी पक्षाचे भाजपात विलीनीकरण करण्यात आल्याचे राघव चढ्ढांनी सांगितले. राघव चढ्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेशही केला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

आता आपच्या भाजपात विलीनीकरणावर महत्वाची माहिती समोर आली आहे. आपच्या राज्यसभेत विलीनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. आप (AAP) खासदारांच्या पत्रात सात सदस्यांची यादी आहे, हे पत्र भाजपकडे प्राप्त झाले आहे आणि त्याची औपचारिकपणे दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया राज्यसभा अध्यक्षांनी देखील मंजूर केली आहे. दहाव्या अनुसूचीच्या तरतुदींनुसार, विलीनीकरणासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणात ही अट पूर्ण झाली आहे, त्यामुळे अपात्रतेचा प्रश्न उद्भवत नाही.

राज्यसभेत ‘आप’चे 10 खासदार आहेत, त्यापैकी दोन-तृतीयांश, म्हणजेच सात, आमच्यासोबत आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-
राघव चड्ढा
संदीप पाठक
राजेंद्र गुप्ता
विक्रम साहनी
स्वाती मालीवाल
हरभजन सिंग
अशोक मित्तल

आम आदमी पक्षाने (आप) याला नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. ‘आप’चे राज्यसभा प्रतोद एन. डी. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ते राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या विरोधात राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र सादर करणार आहेत. या तिन्ही नेत्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे ‘आप’चे राज्यसभा प्रतोद या तिन्ही खासदारांविरुद्ध तक्रार दाखल करतील. हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता यांनी अद्याप भाजपमध्ये सामील झाल्याचे जाहीर केलेले नाही.

भाजपनं इलेक्टोरल बाँडमध्ये भ्रष्टाचार केला, भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी आहे, त्या पार्टीत सामील होत तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असल्याचं सांगताय, तुमच्या गोष्टी कोण मान्य करेल, असा सवाल संजय सिंह यांनी केला. आपवर आणि पंजाबच्या जनतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या गद्दारीचं उत्तर पंजाबचे लोक देतील, असे संजय सिंह म्हणाले.

राज्यसभा खासदारांनी ‘आप’ला ठोकला रामराम; अरविंद केजरीवाल म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *