राज्यसभा खासदारांनी ‘आप’ला ठोकला रामराम; अरविंद केजरीवाल म्हणाले…

Arvind-Kejriwal
Share

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक यांनी पक्षाच्या राज्यसभेतील सात खासदारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर केवळ एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला धोका दिला, असे केजरीवाल म्हणाले. राघव चढ्ढा यांच्यासह इतर सहा खासदार भाजपमध्ये विलीन झाले आहेत. पत्रकार परिषद घेत राघव चढ्ढा यांनी भाजपमध्ये विलीन होत असल्याचे म्हटले. यानंतर आम आदमी पार्टीकडून राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, राज्यसभा खासदार संजय सिंह आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या फुटलेल्या खासदारांचा त्यांच्या प्रतिक्रियेत कुठेही उल्लेख केला नाही. केजरीवालांच्या पोस्टमध्ये भाजप आणि पंजाबचा उल्लेख आहे. भाजपनं पंजाबला पुन्हा धोका दिला, असे म्हणत केजरीवालांनी फुटलेल्या खासदारांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळालं.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

संजय सिंह म्हणाले, ‘आम आदमी पार्टीच्या सात खासदारांना फोडून भाजपमध्ये सामील केले. ही सात नावं पंजाबच्या जनतेनं लक्षात ठेवावीत, पंजाबसोबत गद्दारी करणाऱ्यांना पंजाबची जनता यांना माफ करणार नाही. राघव चढ्ढाला पार्टीनं आमदार केलं, खासदार केलं काय काय दिलं नाही. पंजाबच्या जनतेनं राज्यसभेत पाठवलं आणि तुम्ही भाजपच्या कुशीत पोहोचला. संदीप पाठकला पंजाबच्या जनतेला राज्यसभेत पाठवलं, मोठ्या जबाबदाऱ्या पक्षानं दिल्या, असं संजय सिंह म्हणाले. हरभजन सिंगला संसदेत पाठवण्याचं काम केलं. मात्र, सात जणांनी पंजाबसोबत गद्दारी करण्याचं काम केलं आहे. पंजाबच्या चांगल्या सरकारला रोखण्याचं काम त्यांनी केलं आहे.’

आमच्या खासदारांना फोडलं जातंय, त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं जातंय, काही दिवसांपूर्वी अशोक मित्तलच्या इथं ईडीचा छापा पडला. गोष्टी जुळून येतात, ईडीचा छापा पडला आणि फोडलं, याचा अर्थ भीती दाखवून, प्रशासनाचा दुरुपयोग करुन ऑपरेशन लोटस चालवलं जातंय, पंजाबची जनता गद्दारांना माफ करणार नाही, असेही संजय सिंह म्हणाले.

भाजपमध्ये विलीन झालेल्या खासदारांची नावे पुढीलप्रमाणे :
राघव चड्ढा,राजिंदर गुप्ता ,अशोककुमार मित्तल ,संदीप पाठक ,विक्रमजीत सिंग सहानी , हरभजन सिंग, स्वाती मालीवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *