खळबळजनक आरोप! उपमुख्यमंत्र्याच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये कोट्यावधी रुपयांचं सापडलं ड्रग्ज…

sushma-andhare
Share

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी 2017 साली ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती लपवून ठेवली. पोलिसांनी याठिकाणी कारवाई केली पण ड्रग्जशी संबंधित ज्या तीन लोकांची नावं एफआयआरमध्ये असायला पाहिजे होती, ती नाहीत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. एखाद्या प्रकरणात पोराचं नाव आलं तर बापाचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

संबंधित प्रकरण उघडकीला आणल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. या विषयावर सक्तीचं राजकारण बाजूला ठेवून ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी आशा मला आहे. ऍड उके नावाच्या व्यक्तीने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, नवाब मलिक यांनी देखील काही मुद्दे समोर आणले होते, त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं होते हे सर्वांनी पाहिले, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *