मोठी बातमी! ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या डिनरला हजर…

uddhav-thackeray
Share

मुंबईः शिवसेना शिंदे गटाच्या डिनेर डिप्लोमसीला शिवसेना ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी उपस्थिती लावल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी डिनर आयोजित केले होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित होते.

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावली. त्यामुळे विविध चर्चांना उधाणा आले आहे. मात्र केवळ शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गेलो होतो, असे स्पष्टीकरण नागेश आष्टीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

नागेश आष्टीकर म्हणाले, ‘शिवसेना शिंदेंचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता. त्यांनी आम्हाला सभागृहामध्ये विनंती केली होती. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो होतो. 5-10 मिनिटांसाठी गेलो आणि भेटलो. याचा अर्थ आम्ही वेगळ्या चर्चेला गेलो होतो असे नाही. काही बातम्या नसल्या की ऑपरेशन टायगरची चर्चा होते. पण त्यात तथ्य नाही. मला वाटतं सुख-दुख:त एकमेकांना भेटलं पाहिजे. एकाच सभागृहातील असल्याने या भेटीत काही गैर नाही.’

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दरम्यान, तुतारीचे 6 खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्याची एकनाथ शिंदेची तयारी होती. सध्या शिवसेना शिंदेंकडे 7 खासदार आहेत. जर शरद पवार गटाचे 6 आणि ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंकडे आल्यास एकूण 19 खासदार शिवसेना शिंदे गटाचे होतील. त्यामुळे 19 खासदारांचा संख्याबळावर राज्यातील बार्गेनिंग पॉवर वाढवणे. तसेच 2029 च्या निवडणुकीत किमान 19 जागांवर एकनाथ शिंदे दावा करणार असल्याची रणनीती होती. परंतु भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या या रणनीतीला अद्याप ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाहीय. मागील दिल्ली भेटीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना भेट दिली नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *