बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 19वा दिवस असून सध्या ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आहेत. उपोषणामुळे अशक्तपणा आल्याने त्यांनी पाटोद्यात सलाईन घेतले असून पाणीही प्यायल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. दरम्यान, डॉक्टरांकडून जरांगे पाटलांच्या प्रकृतीची तपासणी केली जात असून त्यांनी प्रवास करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या मुंबई दौऱ्यावर ठाम असून उद्या आपण मुंबईसाठी रवाना होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी मुंबईला जाणार आहे, थांबणार नाही, मुंबईसाठी मी उद्या दुपारी निघणार. आज मला जाता आला नाही, आजच्या ऐवजी मी उद्या दुपारी 1 नंतर मुंबईला जाणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा नेहमी अपमान केला जातो, आम्हाला रस्त्यावर जास्त थांबवू नका. सरकारकडून ड्राफ्ट आलाय, राज्य सरकारचा ड्राफ्ट पाहून त्याबाबत बोलतो. मात्र, मी मुंबईला जाणार आहे, थांबणार नाही, मुंबईसाठी मी उद्या दुपारी निघणार. आज मला जाता आला नाही, आजच्या ऐवजी मी उद्या दुपारी 1 नंतर मुंबईला जाणार आहे. पण, जे पाटोद्यात थांबले ते गावाकडे जातील, मला मुंबईला जाण्यापासून अडवल्यावर मी तुम्हाला बोलावून घेतो, असे म्हणत जरांगे पाटील यांनी त्यांच्या ताफ्यामागे आलेल्या मराठा बांधवांना गावाकडे, अंतरवालीत परतण्यास सांगितले. तसेच, मी शंकरगडाच्या महंतांच्या सांगण्यावरून सलायन आणि पाणी घेतले, असेही त्यांनी म्हटले. रस्त्यात कोणीच थांबू नये, मला कोण अडवतं, मग महाराष्ट्राला सांगतो. आता, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली मुक्काम नाही थेट मुंबई. मी सांगितलं आज चला, ज्यादिवशी सांगेल त्या दिवशी मुंबईला यायचं, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे. माझं ऐकायचं नसेल तर मी अंतरावलीला जातो, तुम्ही मुंबईला जा, असा उपरोधात्मक टोलाही पाटलांनी समर्थकांना लगावला.
View this post on Instagram
मला ड्राफ्टबद्दल आज कळालं, मला समाजाशिवाय तुमच्याशिवाय कोण आहे. माझ्या शिवराळ भाषेबद्दल बोलतात, जरांगे पाटील आधी चांगलं बोलले, त्यावेळी चर्चा झाली नाही का, कोणत्या मंत्र्यांनी झक मारली म्हणून ते तसं बोलले. शिबीर कशाला लावायचे हे विखे पाटलाला माहीत नाही, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात लावले होते. शिंदे समितीच्या जीआर प्रमाणे काम झाले पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
13 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या पण हैदराबाद जीआरचे काय झाले ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं, हैदराबाद गॅझेटचा सुधारित जीआर काढावा. पश्चिम महाराष्ट्रामधील बागायतदाराला आरक्षण नाही का? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. तसेच, विखे पाटील, शिवसेनेचा एक मंत्री अन्य दोन मंत्री पाटोद्याला येणार आहेत असं मला समजलं. पण, काम करत असतील तरच या, असे आवाहन जरांगे पाटलांनी सरकारला केले आहे. तसेच, मराठवाड्यातला मराठा आरक्षणात घाला, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
मुंबईत येऊन आझाद मैदानावर एकट्यानेच उपोषण करण्याचा मनोज जरांगेंचा निर्धार
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मोर्चाची परवानगी नाकारली, जरांगे पाटील म्हणाले…
मनोज जरांगे यांची मुंबईला जाण्याची घोषणा; मुक्कामाचे ठिकाण ठरलं; अडवलंच तर…
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट…