दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; मुहुर्तही ठरला…

mantralaya
Share

मुंबई : राज्यातील दुष्काळाचे तालुके सरकारने घोषित केले आहेत, आता दु्ष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील आरटीओ विभाग हे महत्वाचं खातं आहे, हे खात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेत आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळ सुरु केले होते. त्या माध्यमातून आता, राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारकांना 1 लाख रिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत दरवर्षी 20 हजार रिक्षा दिल्या जाणार असून ⁠90 टक्के कर्ज आणि 10 टक्के अनुदानही शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच, या रिक्षाधारकांना आरटीओची फी माफ होणार आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेटला हा प्रस्ताव पाठवणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना समावेश या योजनेत असेल. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी रिक्षांसाठी अर्ज केल्यानंतर म्हाडाच्या घरासारखी लॉटरी काढली जाईल. एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस आहे, त्या दिवसापासून या रिक्षावाटप योजनेची सुरुवात करणार आहे. अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त रिक्षा सन्मान योजना सुरु करत आहोत, ही रिक्षा त्याच जिल्ह्यात शेतकऱ्यांना वापरता येईल, असेही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे 14 धडाकेबाज निर्णय; पुढील तीन महिने मोफत धान्य…

चर्चांना उधाण! शरद पवार यांच्या निवृत्तीच्या बातमीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!