काँग्रेस खासदाराच्या गाडीला पहाटे भीषण अपघात…

congress
Share

भंडारा: काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला आज (सोमवार) भीषण अपघात झाला असून, अपघातात खासदार पडोळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. प्रशांत पडोळे हे आपल्या काही सहकाऱ्यांसह नागपूरच्या दिशेने जात असताना कारला भीषण अपघात झाला. या अपघातात पडोळे यांच्या आलिशान फॉर्च्युनर कारचा चक्काचूर झाला आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली आहे. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र गाडीचा समोरील भागाचं पूर्णतः नुकसान झाले आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

सध्या दिल्ली येथे अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे भंडाऱ्यावरून नागपूर विमानतळावर जात होते. यावेळी अचानक रस्त्यात ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले आहेत. ते सध्या सुखरूप आहेत. मात्र गाडीचा काही भाग पूर्णतः चक्काचूर झाला आहे. याच मार्गावर हा तिसऱ्यांदा अपघात घडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *