अजित दादांचा घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, मुर्दा खोदून काढू…

Devendra-Fadnavis
Share

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीबद्दल प्रश्न उपस्थित केले. अपघात की घातपात यासंदर्भात सुरू असलेल्या चौकशीबाबत सरकार का बोलत नाही, सद्यस्थिती काय आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने एफआयआर घेतला नाही, पण कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करुन घेतला, असेही रोहित पवार यांनी सभागृहात बोलताना आवर्जून सांगितले. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात भूमिका मांडली असून रोहित पवारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच, अजित दादांचा घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, मुर्दा खोदून काढू असेही ठणकावून सांगितले.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावार उत्तर देताना अगोदर अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले. याप्रकरणी, कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवरही फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिले. डीजीसीए अहवाल आणि आजपर्यंतच्या तपासाची माहिती दिले. तसेच, अजित दादांचा अपघात हा जर घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, खोदून काढू, सोडणार नाही. कदाचित तुमच्यापेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही की अजित दादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्परिन्सी करेल, तर आम्ही त्याचा मुदडाही खोदून काढू अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांच्या प्रश्नांवर उत्तर देत याप्रकरणी टोकाच तपास करण्याचे ठणकावले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

रोहीत पवार राहूल गांधी यांना भेटले, त्यांनी कर्नाटकमध्ये अपघातासंदर्भाने एफआयर करायला सांगितला. मात्र तसा झिरो एफआयर करता येत नाही, तो चुकीचा आहे. कर्नाटकने राजकीयदृष्ट्या तपास नीट सुरु नाही, यासाठी हा एफआयर दाखल केला आहे. महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी हा एफआयआर केला असेल, तुमच्या मनात शंका ठेवू नका. पण, जर यात कोणी असेल तर आकाश पातळ एक करु, मुडदाही खोदून काढू, अशा शब्दात फडणवीस यांनी भूमिका मांडली. तुम्ही तरुण आहात, तुमच्या भावना समजू शकतो. मात्र, अजित दादांच्या अपघाती निधनाबद्दल इतरांच्या भावनाही तेवढ्याच आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

अजितदादांच्या विमान अपघातबद्दल मुख्यमंत्र्यांचा नवा खुलासा…

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता मोठे वळण…

अजित पवार यांच्या घातपाताचा संशय! राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग…

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…

अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *