पुणे! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरे यांनाच घरचा आहेर…

pmc
Share

पुणे : पुणे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एकूण तीन नगरसेवकांना शहर विद्रुपीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर आता पालिकेकडून महापौर मंजुषा नागपुरे यांना घरचा आहेर दिला आहे. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या नावाने अनधिकृत बॅनर असल्याचा फोटो महानगरपालिकेकडून पोस्ट करत ड्रेनेजची तसदी समजू शकतो. फ्लेक्सची तसदी कशाबद्दल? असा सवालही यामध्ये उपस्थित केला आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांना पुणे महापालिकेच्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून घरचा आहेर दिला आहे. पुणे मनपा प्रशासनाच्या रडारवर महापौर मंजुषा नागपुरेसुद्धा आल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. महापौरांच्या अनधिकृत फ्लेक्सचा फोटो ट्विटरवर टाकून प्रशासनाने सवाल उपस्थित केला आहे. ‘ड्रेनेजच्या तसदीबद्दल क्षमस्व’ असा महापौरांचं बॅनर लावण्यात आला आहे. ड्रेनेजची तसदी समजू शकतो,फ्लेक्सची तसदी का? असा सवाल प्रशासनाने उपस्थित केला आहे. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या नावाने अनधिकृत बॅनर लावण्यात आल्याची माहिती आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अनधिकृत फ्लेक्सविरोधातील डिजिटल मोहिमेदरम्यान, महापालिकेच्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरून विद्यमान महापौर मंजुषा नागपुरे यांनाच मिश्किल टोला लगावण्यात आल्याने त्या प्रशासनाच्या रडारवर आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुणे शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या बेकायदेशीर फ्लेक्स बाजांना आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही विशेष डिजिटल मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत bhauflexkadha.pmc.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, तिथे नागरिक अनधिकृत फ्लेक्सचे फोटो अपलोड करू शकतात. ज्या व्यक्तीचे सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्स आढळतील, त्याचे नाव २४ तासांत वेबसाईटवर ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी’ म्हणून जाहीर केले जाणार आहे. या मोहिमेच्या प्रसिद्धीदरम्यान महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून थेट महापौर मंजुषा नागपुरे यांनाच लक्ष्य करत मिश्किल टोला लगावण्यात आला. त्यामुळे “प्रशासनाने स्वतःच्याच महापौरांना सोडले नाही” अशी चर्चा सध्या पुणेकरांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगली आहे. ही मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच तब्बल ७६४ नागरिकांनी शहरातील अनधिकृत फ्लेक्सचे फोटो या वेबसाईटवर अपलोड करून तक्रारी नोंदवल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे शहरात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे’ मानकरी ठरले भाजपचेच नेते…

पुणे महापालिकेच्या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकाऱ्यांचा अजब कारभार!

पुणे महापालिकेच्या रेकॉर्ड रूममधून महत्त्वाची फाईल गायब?

बातमीची तत्काळ दखल! पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील कुंड्यांना मिळाले ‘जीवदान’

One thought on “पुणे! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरे यांनाच घरचा आहेर…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!