महापौर मंजुषा नागपुरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यातील स्टॅण्डींग चर्चा!

pmc
Share

पुणे (संतोष धायबर): पुणे महानगरपालिकेत संध्याकाळी साधारण आठ वाजण्याच्या सुमारास एक वेगळीच घडामोड पाहायला मिळाली. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते तथा पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यात तब्बल तासभरापेक्षा जास्त वेळ स्टॅण्डींग चर्चा सुरू होती.

विशेष म्हणजे, ही चर्चा बसून नव्हे, तर दोघेही उभे राहून सुरू होती. यावेळी अनेकांचे त्यांनी लक्ष वेधून घेतले. साधारण एक तासापेक्षा अधिक काळ दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याने महापालिकेतील या भेटीची चर्चा रंगू लागली आहे.

Devabhau

दरम्यान, या चर्चेमध्ये नेमके कोणते विषय होते, महापालिकेतील आगामी निर्णय किंवा राजकीय रणनीतीबाबत काही चर्चा झाली का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, महापौर आणि सभागृह नेत्यांमधील या दीर्घ चर्चेमुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाय, या दोन्ही नेत्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकाळत उभे राहावे लागले. यामुळे अनेकांना नाराजी व्यक्त केली.

पुणे महापालिकेच्या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकाऱ्यांचा अजब कारभार!

पुणे महापालिकेतून फाईल ‘गायब’ होण्याचा फटका हॉटेल मालकाला; २० कुटुंबांवर उपासमारीची वेळ…

बातमीची तत्काळ दखल! पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील कुंड्यांना मिळाले ‘जीवदान’

पुणे महापालिकेच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिक संतप्त; हरित शहराचा फाटला बुरखा…

One thought on “महापौर मंजुषा नागपुरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यातील स्टॅण्डींग चर्चा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!