मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला ममदानीचा विरोध

Share

न्यूयॉर्कः न्यूयॉर्कचे भारतीय वंशाचे महापौर झोहरान ममदानी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. शहराच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे येत्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेत, भागवत हे अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करणार आहेत.

रा. स्व. संघाच्या (आरएसएस) शताब्दी वर्षातील जागतिक संपर्क कार्यक्रमाचा भाग म्हणून सरसंघचालक बुधवारी सकाळी अमेरिकेत दाखल झाले. न्यूयॉर्कमधील वास्तव्यादरम्यान, ते ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमात सहभागी होतील आणि शनिवारी (२९ ऑगस्ट) प्रतिष्ठित मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे सुमारे ५,००० लोकांच्या मेळाव्याला संबोधित करतील.

पत्रकारांशी बोलताना ममदानी म्हणाले, ‘मी आपल्या शहराच्या इतिहासातील पहिला भारतीय-अमेरिकन महापौर म्हणून येथे उभा आहे, माझ्या आईचे कुटुंब अजूनही भारतातच आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपलेपणा वाटावा यावर विश्वास ठेवणारा धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक’, ही आपली संकल्पना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *