अमरावती : अमरावती महानगरपालिकेचे क्रमांक तिनचे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांना ठाकरे गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे आणि त्यांच्या साथीदाराकडून यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजय गव्हाणे त्यांच्या सहकार्यासह काही कामानिमित्त सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना भेटायला गेले होते. मात्र या दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी संजय गव्हाळे यांनी जातिवाचक शिवी देऊन मारहाण केल्याचा आरोप आयुक्त नितीन काळे यांनी केला आहे. या प्रकरणी आता सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांनी फ्रिजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या घटनेमुळे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांनी अरेरावेची व अप्पामानास्पद वागणूक दिल्याने त्यांना शिवसेना स्टाईलने तर दिल्याचे प्रतिक्रिया नगरसेवक संजय गव्हाळे यांनी दिली.
महापौर मंजुषा नागपुरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यातील स्टॅण्डींग चर्चा!
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सरकारला घरचा अहेर…
चर्चांना उधाण! रोहित पवार यांनी मफलरमॅन म्हणून दाखवला फडणवीसांचा फोटो…