चर्चांना उधाण! रोहित पवार यांनी मफलरमॅन म्हणून दाखवला फडणवीसांचा फोटो…

rohit-pawar
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा दिवंगत नेते अपघाती निधनावरुन सवाल उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी आज (सोमवार) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मफलर मॅनचे नाव घेतले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मफलर मॅन म्हणून रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला आहे.

रोहित पवार म्हणाले, दादांच्या अपघातामागे सत्य काय आहे हे अजूपर्यंत आपल्याला समजलं नाही. ते समजावे असे आपल्याला सर्वांना वाटते. अपघात की घातपात हा सवाल सर्वांनाच पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा मी प्रामणिक प्रयत्न करत आहे. पण आमच्याकडे प्रामणिक लोक आहेत. या लोकांकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. ती माहिती तुम्हाला मी आजपर्यंत पोहोचवली आहे. त्यांनाही माहिती आहे, कुणीतरी त्यांची माहिती काढू शकतं, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. ज्यांनी माहिती दिली त्यांनाही मी विचारलं तेव्हा ते म्हणाले आमच्यावर कारवाई होईल तेव्हा होईल.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच VRS कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप रोहित पवार यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे व्ही के सिंहच्या जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्यांनीच या कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यामध्ये जर चूक असेल तर सरकारने तपास करावा, असे आव्हानही रोहित पवार यांनी केले आहे. या सरकारने व्ही के सिंह आणि त्याच्या कंपनीला जरी वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी आमचं सरकार आलं तर त्याला सोडणार नाही. त्यांचा हा पुतण्या कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रोहित पवार म्हणाले, या व्यक्तीने घातपात केला असे मी म्हणत नाही. मात्र, वीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी तुम्ही मदत करत असल्याचा आम्हाला संशय आहे. व्ही के. सिंग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला होता. तुम्ही व्हीएसआर आणि VK सिंगला वाचवत आहात अशी आम्हाला शंका आहे. एका फोटोवरुन असे आरोप करणे, हे अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण आहे. रोहित पवार यांनी आज जे केले, त्यातून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचे संस्कार आणि महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीला मातीत घातले आहे. याचा करावा तितका धिक्कार कमी आहे. आमची अजून एक मागणी आहे की, रोहित पवार यांच्या या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि आदरणीय शरद पवार साहेबांनीही आपली भूमिका तातडीने स्पष्ट केली पाहिजे.

अजितदादांच्या पुतळ्याचे भावूक वातावरणात अनावरण! डोळ्यात अश्रू, शब्द जड अन् चर्चा…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

‘देवाभाऊ’ पुस्तकाचा सह्याद्री अतिथीगृहावर दिमाखदार प्रकाशन सोहळा!

बारामतीत अजितदादांचा अपघात झाला तिथंच आणखी एक विमान कोसळलं, वेळ तीच वेळ अन् गावही…

अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!