राजस्थानमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट…

Rahul-Gandhi
Share

नवी दिल्ली : राजस्थानच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. या विजयानंतर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी खास पोस्ट लिहित राज्यातील ग्रामीण भागातील जनतेचे आभार मानले आहेत. भाजपने मनरेगावर हल्ला केला, शेतकऱ्यांना तोट्यांमध्ये घालवलं, पंचायतींचे अधिकार हिसकावून घेतले. महागाई, बेरोजगारी आणि स्थलांतरामुळं गाव ओसाड केली आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, गावं सर्व पाहत होती. हा फक्त राजस्थानचा जनादेश नाही, देशातील प्रत्येक गावाचा आवाज आहे. राजस्थानातील सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत दोन्ही ठिकाणी काँग्रेसनं शानदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, भाजपचा सर्वात मोठा पराभव राजधानी असलेल्या जयपूर जिल्हा परिषदेत झाला आहे. जयपूरच्या 57 जागांपैकी भाजपला केवळ 12 जागांवर विजय मिळवता आला आहे. काँग्रेसनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. राजधानी जयपूरमधील 22 पंचायत समित्यांपैकी 2 पंचायत समित्यांमध्ये भाजपला दोन ठिकाणी बहुमत मिळालं आहे. तर, काँग्रेसला 14 पंचायत समित्यात विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सांगानेर मतदारसंघात खासदार हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीनं बहुमत मिळवले आहे.

राहुल गांधी यांचे नरेंद्र मोदी यांना पुन्हा चॅलेंज; घाबरू नका; दूध का दूध, पानी का पानी…

शिंदे, आझाद यांच्यासारखे भित्रे आणि लोभी बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये उरले केवळ सिंह – राहुल गांधी

राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपचा डावः प्रणिती शिंदे यांचा आरोप

One thought on “राजस्थानमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!