पुणे: पुणे शहरातील हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’ (Mathura Pure Veg) हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न पदार्थांच्या चाचणीचे अहवाल येईपर्यंत हे हॉटेल बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच पुण्यातील तब्बल 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात हॉटेल चालकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. 1 ते 3 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यातील तब्बल 70 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी करण्यात आली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
पुण्यातील ज्या 7 रेस्टॉरंट्सवर एफडीएने धाडी टाकल्या, तिथे अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. तपासणी दरम्यान हॉटेलच्या स्वयंपाकघरात कमालीची अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाने त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.
पुणे शहरातील प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’वर झालेली कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एफडीएच्या पथकाने या हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. हा चाचणी अहवाल जोपर्यंत अधिकृतपणे येत नाही, तोपर्यंत हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही हॉटेलची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आगामी काळातही पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही तपासणी मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.
तुकाराम मुंढे यांची मुंबईतील ६ मोठ्या हॉटेल्सकारवाई; थेट परवाने रद्द…
तुकाराम मुंढे यांचा ॲमेझॉन इंडियाला मोठा दणका; थेट गोदामाचा परवाना रद्द…
हॉटेलधारकांनो ग्राहकांसमोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढे
मोठी खळबळ! तुकाराम मुंढे यांची विकेट काढण्यासाठी 250 कोटींची सुपारी…