मुंबई : इतिहासामध्ये अनेक गद्दार झाले, त्यांना काही भूमिका होती का? एकंदरीत गद्दारांना कोणतीही भूमिका नसते आणि ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जर कुणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी केंद्रातून एकनाथ शिंदे यांचा वापर केला जातोय, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंची साथ देणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गद्दारांना भूमिका असते का? ठाकरेंना सोडून गेलेले सगळे हे नामचिन गद्दार आहेत. शिंदें गटामध्ये गेल्यानंतर ओम निंबाळकरांच्या वडिलांचा आत्मा त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न. आता ओम निंबाळकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते त्याच गटामध्ये आहेत. आता तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील हा निव्वळ स्वार्थीपणा आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
ओमराजे निंबाळकरांच्या वतीने कुणी पैसे घेतले, पहिला 15 कोटींचा अॅडव्हान्स कुठे आणि कसा घेतला गेला याची सगळी माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचली आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राला तोडण्यासारखं आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
‘भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जो काही वाद सुरू आहे, त्याची ही सुरुवात आहे. ज्या पद्धतीने दिल्लीतून शिंदेंना बळ दिलं जातंय ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, याची कल्पना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर केला जात आहे. आमची शिवसेना कमजोर केली जाते ते महाराष्ट्राची ताकद कमी करण्यासाठी आणि मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी. आम्ही कुणाच्या बाजूने असण्याचा प्रश्नच नाही. कारण इथे भूत की राक्षस असं आहे. पण अमित शाहांनी निर्माण केलेला एकनाथ शिंदेंसारखा सैतान असेल, जो देवेंद्र फडणवीसांच्याही मानगुटीवर बसत असेल तर आम्ही त्याबाबत योग्य ती भूमिका घेऊ, असेही संजय राऊत म्हणाले.
…आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरू होणार : संजय राऊत
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! शिंदे गटाला संजय राऊत यांची खुली ऑफर…