उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

sunetra-pawar-maharashtra-che-dada-book
Share

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ या नावाने ईश्वरी प्रकाशनने पुस्तक तयार केले असून, पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील २५ लेखकांचे अनुभव आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागांमधील लेखकांनी दादांविषयी आपले अनुभव कथन केले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एका कार्यक्रमादरम्यान लेखिका डॉ. सुवर्णा निंबाळकर आणि संपादक संतोष धायबर यांनी ‘महाराष्ट्राचे दादा’ हे पुस्तक नुकतेच भेट दिले आहे.

ईश्वरी प्रकाशनच्या वतीने अजितदादांवरील अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवहनाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘महाराष्ट्राचे दादा’ या नावाने पहिले पुस्तक तयार झाले आहे. पुस्तकामध्ये विश्वनाथ प्रभाकरराव राऊत, डॉ. सुवर्णा निंबाळकर, शिवाजी पाटील, दत्ता पायगुडे, डॉ. प्रकाश पांढरमिसे, डॉ. अशोक बालगुडे, सोनाली कापुरे-बिऱ्हाडे, धनश्री पवार, श्रृती पवार, भाग्यश्री आपेगांवकर, सुनिता नेराळे, अनिल चव्हाण, अर्जुन विष्णू जाधव, प्रशांत हिंगे, सुजित दिवेकर, प्रशांत अडसूळ, वेदांत ढगे-पाटील, राजेश धावारे, सुनील पांडे, सुहास गायकवाड, प्रकाश केंद्रे, युवराज गोपाळे, रितेश कांबळे, चंद्रशेखर हळेमनी, अनमोल गेडाम, सम्राट समाधान हनुमान या २५ लेखकांचे लेख समाविष्ट आहेत. ज्येष्ठ पत्रकार संतोष धायबर हे पुस्तकाचे संपादक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

‘महाराष्ट्राचे दादा’ या पुस्तकामध्ये अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, वैयक्तिक आठवणी, अनुभव, तसेच कामकाजातील प्रेरणादायी प्रसंग मांडण्यात आले असून, संग्राह्य असे पुस्तक आहे. पुस्तकाचे पुढील भागही प्रकाशित केले जाणार असून, त्यामध्ये नवीन लेखकांना लिहिण्याची संधी दिली जाणार आहे. प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी पुस्तक पोस्टेज खर्चासह २०० रुपयांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती ईश्वरी प्रकाशनच्या वतीने देण्यात आली.

अधिक माहितीसाठी संपर्क :
ईश्वरी प्रकाशन, पुणे
WhatsApp : 93712 69949
ई-मेल : ishwariprakashan@gmail.com

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *