पुणे : गणेशत्सोवादरम्यान अनेक ठिकाणी दिवंगत अजित पवार यांचे देखावे सादर करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. आंबेगावातील एका गणेश मंडळाने ‘अजित सृष्टी’ हा देखावा साकारला आहे. या ठिकाणी जय पवार यांनी भेट दिली. अजित पवार यांच्या आवाजात असलेलं भाषण सुरू होतं. आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको म्हणून… अजित पवार यांच्या आवाजातलं हे वाक्य ऐकून जय पवार झाले भावुक झाले. डोळे पुसत त्यांनी बाप्पाची आरती केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजित पवार यांनी मंगळवारी (ता. २२) आंबेगाव येथे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ‘अजित सृष्टी’ या देखाव्याला भेट दिली. युवराज बेलदरे यांनी आपल्या गणपतीसमोर लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा भावपूर्ण देखावा उभारला आहे. ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजितदादांच्या कार्याचा आणि त्यांच्या आठवणींचा जागर करण्यात आला आहे. हा देखावा पाहताना जय पवार यांना अजितदादांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. भावनिक वातावरणात अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देताना जय पवार यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि ते भावुक झाले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
वडिलांच्या आठवणींनी गहिवरलेल्या जय पवार यांनी भरलेल्या डोळ्यांनीच श्री गणेशाची आरती केली. स्थानिक कार्यकर्ते युवराज बेलदरे यांनी आपल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकनेते अजितदादा पवार यांच्या कार्याचा आणि आठवणींचा जागर करण्यासाठी हा भावपूर्ण देखावा उभारला आहे. कार्यकर्त्यांच्या विशेष आग्रहाखातर जय पवार यांनी आज या ‘अजित सृष्टी’ देखाव्याला भेट दिली.
जय पवार देखाव्याच्या ठिकाणी पोहोचले असताना पार्श्वभूमीत अजित पवार यांच्याच आवाजातील भाषण सुरू होते. “आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको म्हणून…” हे अजितदादांच्या आवाजातील वाक्य कानावर पडताच जय पवार यांना आपल्या भावना अनावर झाल्या. वडिलांच्या या थेट संवादासारख्या वाटणाऱ्या आवाजाने ते क्षणभर स्तब्ध झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. स्वतःचे डोळे पुसत त्यांनी अत्यंत भावनिक वातावरणात बाप्पाची आरती केली.
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
सुनेत्रा पवार यांचा चेहरा अजितदादांच्या आठवणीने रडवेला अन् भावूक पोस्ट…
अजित पवार यांच्या मृत्यूशी कनेक्शन सांगणारे अशोक खरात याचे अनेक कॉल रेकॉर्ड…