घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ…

gas-cylinder
Share

नवी दिल्ली: देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला आज (रविवार) आणखी एक झटका दिला आहे. आज सकाळपासून घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एलपीजी (LPG) सिलेंडरचा भाव 29 रुपयांनी वाढला आहे. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन महिन्यांत एलपीजीच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर, आता दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील इतर भागांतही 29 रुपयांचीच वाढ झाली आहे.

घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे मुंबईतील 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर 912.50 रुपयांवरुन 941.50 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. यापूर्वी 7 मार्चला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता 29 रुपयांची दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सामान्य माणूस अगोदरच मेटाकुटीला आला असताना एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडणार आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या दरात वाढ केली होती. 1 जून रोजी कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 42 रुपयांनी वाढला होता. गेल्या पाच महिन्यात 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत. 1 जानेवारीपूर्वी 19 किलोच्या सिलेंडरचा दर 1580 रुपये होता. 1 जूनला तोच दर आता 3113.50 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 19 किलोच्या एलपीजीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात जानेवारी महिन्यात 111 रुपये, फेब्रुवारीत 49 रुपये, मार्चमध्ये 28 रुपये, 7 मार्चला 114.50 रुपये, एप्रिल महिन्यात 195.50 रुपये, मे महिन्यात 993 रुपये आणि जून महिन्यात 42 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल आणि खाद्यपदार्थांचे दर वाढले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या चिंता वाढत आहेत. पेट्रोल-डिझेल, गॅस व अन्नधान्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नियम बदलणार…

CNG दरात 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले…

महागाईचा झटका! CNG च्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर…

महागाईचा भडका! व्यावसायिकसह घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये झाली मोठी वाढ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *