मुंबईः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवल्यामुळे ही बैठक वादळी ठरली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटातून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कार्यकारिणीवरुन या सगळ्या नाराजीनाट्याला सुरुवात झाली, त्यासंदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या कार्यकारिणीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे या दोघांनाही पदावरुन दूर केल्याची चर्चा होती. तसेच नवख्या लोकांना राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत स्थान दिल्याने तटकरे आणि पटेल नाराज झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकारिणीची सुधारित नवी यादी निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
नव्या कार्यकारिणीत नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्याऐवजी हसन मुश्रीफ यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारणीतून वगळले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय घडलं…
* प्रफुल पटेलांची बैठकीला दांडी
* सुनील तटकरेंच्या बोलण्याआधिच पार्थ पवारांची बैठकीतून बाहेर
* सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यात वाद
* 10 जून पक्षाचा स्थापना मेळावा कुठं घ्यायचा यावरून मतमतांतरं – मेळावा मुंबईत होणार का पुण्यात?
* सुनेत्रा पवारांची खंत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत विषय काढून देखील अद्याप अर्थ खाते पुन्हा देण्यात आले नाही.
पोस्ट व्हायरल! जय पवार यांनी चार ओळीत संपवला विषय…
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…
राष्ट्रवादीतील नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तभेट; कोणाला सुगावाही नाही…