लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राष्ट्रीय भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. देशाचे भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अखेर या सर्व चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रथमच उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘
एका मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, “2027 नंतर तुमच्या राष्ट्रीय भूमिकेबद्दल चर्चा सुरू आहेत. तुम्ही स्वतःला भविष्यातील पंतप्रधानपदाचे दावेदार मानता की उत्तर प्रदेश हीच तुमची कर्मभूमी राहील?” यावर उत्तर देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, “मी सार्वजनिक जीवनात जबाबदारीची भावना आणि ‘राष्ट्र प्रथम’ हेच माझे मार्गदर्शक तत्त्व मानून आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाने माझ्यावर उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मी या जबाबदारीला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बहुमान मानतो. माझे संपूर्ण लक्ष सध्या उत्तर प्रदेशला आर्थिक, सामाजिक आणि सुशासनाच्या पातळीवर देशात अव्वल स्थानावर नेण्यावर केंद्रित आहे.”
View this post on Instagram
2027 च्या निवडणुकीतील ‘एनडीए’च्या जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, “मित्रपक्ष आणि त्यांच्यासोबत जागांचे वाटप करणे हा पक्षाच्या संघटनेचा विषय आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी हीच आहे की, सरकारच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, जिल्ह्यांपर्यंत आणि घराघरांपर्यंत पोहोचावा. अयोध्या, काशी आणि मथुरा हे धर्मिक पर्यटनाचे माध्यम आहे की आरोग्य-शिक्षणासारख्या मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी याचा वापर केला जातोय? यावर स्पष्टीकरण देताना योगी म्हणाले की, “अयोध्या, काशी आणि मथुरा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी ‘काशी विश्वनाथ धाम’चे उद्घाटन केल्यापासून तेथे 25 कोटींहून अधिक भाविकांनी भेट दिली असून, तब्बल 1.25 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. हा पैसा स्थानिक नावाडी, छोटे विक्रेते, पुजारी आणि हॉटेल चालकांपर्यंत पोहोचला आहे,” असे त्यांनी सांगितले.
धार्मिक स्थळांचा विकास करताना आरोग्य आणि शिक्षणाचे बजेट कमी करण्यात आलेले नाही, असा दावा त्यांनी केला. “पूर्वी उत्तर प्रदेशात इन्सेफेलायटिससारख्या आजारांचे मोठे आव्हान होते, त्यावर आम्ही मात केली. वैद्यकीय शिक्षणाला चालना देत राज्यात आज 80 वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत,” असेही त्यांनी योगी आदित्यनाथ यांनी ठामपणे सांगितले.