अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, कॉल किती पाहा…

abhijeet-bhande
Share

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांनंतर आता प्रशासकीय अधिकारीही अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक खरात सोबत आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप असलेल्या उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडेच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती आहे.

उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे याला अशोक खरात प्रकरण चांगलंच भोवल्याचं चित्र आहे. अशोक खरातसोबत असलेले आर्थिक व्यवहार त्याच्या अंगलट आले आहेत. अशोक खरात याच्यासोबतच अभिजित भांडे याचे कॉल रेकॉर्डस हाती आल्यानंतर महसूलमंत्र्यांनी त्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

भोंदू अशोक खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्यामध्ये तब्बल 143 वेळा फोन कॉल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अशोक खरातने अभिजीत भांडेला 83 वेळा कॉल केले आहेत. तर भांडेने खरातला 60 वेळा कॉल केले आहेत.

4 एप्रिल 2025 ते 15 मार्च 2026 या दरम्यान, अभिजीत भांडे आणि अशोक खरात यांच्यामध्ये हे कॉल झाल्याची माहिती आहे. या दोघांच्या दरम्यान 10,037 सेकंद म्हणजे जवळपास 3 तास कॉल झाल्याचे समोर आले आहे. 7 ऑगस्ट 2025 रोजी या दोघांच्या दरम्यान 11 मिनिटे चर्चा झाली होती. तर 7 जुलै 2025 रोजी, एकाच दिवसात 10 कॉल तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी 14 वेळा कॉल झाल्याचे रेकॉर्ड समोर आले आहे. याच पुराव्याच्या आधारे आता अभिजीत भांडे याच्या निलंबनाचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या नंतर आता अभिजीत भांडेची देखील चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिजीत भांडे हा उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होता. अशोक खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी आता त्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडेची गुंतवणूक असल्याचा आरोप केला जात आहे. आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर महसूल अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणल्याची चर्चा आहे.

दरम्यान, शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकारणी अडचणीत आले आहेत. या प्रकरणात संबंधित सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे अशोक खरातशी संबंधित प्रशासकीय अधिकारी अडचणीत आले असल्याची चर्चा सुरू आहे.

रुपाली चाकणकर यांचा पाय खोलात; खरातसोबत गुवाहाटी दौरा…

अशोक खरात याची दुसरी बाजू माहीत नव्हती : रुपाली चाकणकर

अशोक खरात याच्याबाबत प्रणिती शिंदे यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना पहिला धक्का…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *