पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागली होती. आज (सोमवार) सकाळी 8 वाजल्यापासून बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाच्या 9 व्या फेरीच्या मतमोजणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 78 हजार 528 मतांनी आघाडीवर आहे. सुनेत्रा पवारांची ही आघाडी आणखी वाढत जाणार असून विजयही जवळपास निश्चित झाला आहे. यादरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
सुनेत्रा पवार पोस्ट करत म्हणाल्या, ‘आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. अजितदादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची…’
दरम्यान, बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र एक्झिट पोलनुसार बारामतीत सुनेत्रा पवार दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याची शक्यता आहे. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख 65 हजार 265 मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख 65 हजार 266 हा जादुई आकडा असणार आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…
अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…
बारामतीत बॅनरची चर्चा! शरद पवार यांनी सांगूनही सुनेत्रा पवार यांनी नाही ऐकलं…
बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर निवडणुकीत 23 उमेदवारांचे आव्हान…