मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

supriya-sule
Share

पुणे: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना देखील बसला आहे. सकाळी जवळपास दोन ते तीन तास त्या वाहतूक कोंडीत अडकल्या. सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने झेंडावंदनसाठी वेळेत पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे पक्ष कार्यालयातील झेंडावंदन माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

सुप्रिया सुळे यांनी वाहतूक कोंडीचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी म्हटलंय की, नमस्कार, गेले दोन तास आम्ही सगळे वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. सकाळी आम्ही सात वाजता ठाण्यावरून निघालो होतो, आता दोन तास गाडीत बसून आमची आजुबाजूच्या लोकांसोबत मैत्री झाली आहे, तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, सगळे आम्ही वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. त्याचबरोबर आजुबाजूला असलेल्या कारमधील प्रवाशांनी देखील सुळेंच्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, आम्ही देखील ७ वाजता निघालो होतो, महाराष्ट्र दिन स्पेशल म्हणत नागरिकांनी व्हिडीओमध्ये वाहतूक कोंडीबाबत भाष्य केले आहे. तर सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

खासदार सुप्रिया सुळे मुंबईवरून पुण्याकडे जात असताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण वाहतूक कोंडीत अडकल्या. त्या सुमारे दोन तासांहून अधिक काळ या ट्रॅफिकमध्ये होत्या सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून या वाहतूक कोंडीचे फोटो आणि व्हिडिओ काढून आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर केले. त्यांनी “मुंबई पुणे रोड” असे लिहून हात जोडल्याचे इमोजी वापरत आपली हतबलता व्यक्त केली.

दरम्यान, सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहन बंद पडल्याची घटना घडली आहे. आजच मिसिंग लिंकच लोकार्पण सोहळा होत असताना प्रवाशांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवून पुण्याकडची वाहतूक सोडवली जात आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतुक ही खोळबंली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या; पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, मागच्या वेळेस…

दिल्ली की पुन्हा पवार? राज्यसभेवर पुनरागमनासाठी मविआत खलबतं; सुप्रिया सुळेंनी थेट रणशिंग फुंकल!

अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *