राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय…

gram-panchayat
Share

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेतील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रति मतदान केंद्र १५ हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. या निधीतून संबंधित निवडणुकांचा खर्च भागविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच यांच्या निधन, राजीनामा किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी एकूण ५ कोटी ९५ लाख ५ हजार रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे. हे अनुदान संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरित करून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

शासनाने स्पष्ट केले आहे की, मंजूर केलेले हे अनुदान २८ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या खर्चासाठीच वापरणे बंधनकारक असेल. तसेच, मंजूर रकमेपेक्षा अधिक खर्च होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये आणि खर्च ठरवलेल्या निकषांमध्येच राहावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. मंजूर अनुदान अंतिम अनुदानातून वजा करून उर्वरित रक्कम पुढे वितरित करण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कामकाजासाठी दिलेल्या निधीतून कोणतीही देयके प्रलंबित राहणार नाहीत, याची खात्री करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत पोटनिवडणुकांवरील प्रत्यक्ष खर्च लक्षात घेऊन अनुदानाचे योग्य वितरण करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये समन्वय साधून निधी वाटप करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. ग्रामपंचायती व विभागीय मंडळांच्या निवडणुकांशी संबंधित सर्व खर्च सन २०२६-२७ च्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाचा अत्यंत महत्वाचा निर्णयामुळे सरपंचांना मोठा दिलासा…

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच वाजलं बिगुल; पाहा कधी मतदान…

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय…

राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत झाले ७ महत्त्वाचे निर्णय; कोणते पाहा…

राज्यातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा; निवडणुका होईपर्यंत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *