अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…

ajit-pawar-sunetra-pawar
Share

बारामती : बारामतीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची काल सांगता सभा झाली. या सभेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान केलं.

अजित पवार यांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे. त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन विनंती केली आहे. काही चुकीचं आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांच्या अपघाताबाबतच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं, अशी मागणीही सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही मंचावर उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी केलेल्या मागणीवर फडणवीसांनीही उत्तर दिले. अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

अजितदादा जरी गेले तरी त्यांची स्वप्न अजूनही जिवंत आहेत. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. मात्र त्यांच्या विचाराचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मी खचणार नाही. मागे हटणार नाही. मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, तसेच मी लढेन. अहिल्यादेवींनी जसा कारभार केला, तसाच कारभार करेन, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. ही माती माझी आहे, त्यामुळे दादांप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही. आपण लाखोंचा पोशिंदा गमावला. दादांचं स्वप्न आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव, त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेल्या जबाबदारीची जाणीव आहे. त्याचा शिवधनुष्य मी उचलून तुमच्यासमोर आले आहे. दादांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाईन, असंही सुनेत्रा पवरांनी सांगितले.

बारामतीतील सांगता सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. बारामतीत दाखल होताच देवेंद्र फडणवीस सर्वात आधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर गेले. देवेंद्र फडणवीसांनी स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल झाले. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणातून अजित पवारांच्या आठणीही जागवल्या. आधी अजित पवारांसंदर्भातील एक व्हिडीओ सभेत दाखवण्यात आला. या व्हिडीओत अजित पवारांची गाजलेली वक्तव्य, दादांच्या कामाची शैली, याचा उल्लेख करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहताना सभेला उपस्थित असलेले नेते आणि बारामतीकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर सभेत भाषण करताना अनेकांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…

अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका; सुनेत्रा पवार आक्रमक…

बारामतीत बॅनरची चर्चा! शरद पवार यांनी सांगूनही सुनेत्रा पवार यांनी नाही ऐकलं…

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर निवडणुकीत 23 उमेदवारांचे आव्हान…

अजित पवार यांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या…

बारामतीत रणशिंग! अजित पवार यांचा वारसा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *