धक्कादायक मागणी! स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांची नावं, फोटो, Video सार्वजनिक करा…

Subodh-Sawaji-buldhana
Share

बुलढाणा: नाशिकमधील अशोक खरात आणि आयटी कंपनीमधील लैंगिक छळाचं प्रकरण, अमरावतीमधील परतवाडा येथे तरुणाने 180 महिलांचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या एका माजी मंत्र्यांने राज्यपालांना पत्र लिहून एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक मागणी केली आहे.

स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे आणि व्हिडिओ जाहीर करा! अशी धक्कादायक मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. सुबोध सावजी यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पाठवलेल्या पत्रामध्ये, “राज्यात ‘स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या’ महिलांची संख्या वाढतेय! इतकंच नाही, तर अशा महिलांची नावे, त्यांचे फोटो आणि उपलब्ध असल्यास त्यांचे व्हिडिओसुद्धा शासनाने सार्वजनिक करावेत,” अशी धक्कादायक मागणी त्यांनी केली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

सावजी यांनी पत्रात म्हटले की, “अनेक महिला पैशांच्या लालसेपोटी किंवा स्वार्थासाठी भोंदू बाबा आणि महाठगांच्या संपर्कात येतात. अशा महिलांमुळे समाजावर कलंक लागत असून, त्यांची ओळख उघड केल्यासच अशा घटना थांबतील.” नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा दाखला देत सावजी यांनी ही मागणी केली आहे. मात्र, कायद्यानुसार पीडितेचं नाव गुप्त ठेवणं बंधनकारक असताना, माजी मंत्र्यांनी केलेली ही मागणी आता नव्या वादाला तोंड फोडणार हे निश्चित.

दरम्यान, सुबोध सावजी हे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री असून त्यांनी महसूल राज्यमंत्रीपद भूषवलं आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर-लोणार मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेले सुबोध सावजी सध्या स्वतंत्रपणे माजी मंत्री म्हणून सक्रिय आहेत. सुबोध सावजी यांनी यापूर्वीही त्यांनी अशी अनेक विधानं केली आहेत. निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना पत्राद्वारे धमकी दिल्याचा आरोप सावजींवर आहे. त्यांनी एकदा भिडे गुरुजींच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याने ते वादात सापडले होते. तसेच त्यांनी एकदा राज्य शासन टीका करताना शासन भिकारी आहे का? असे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते.

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

अशोक खरात याच्याबाबत प्रणिती शिंदे यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना पहिला धक्का…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना चौकशीला कधी बोलवणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *