बारामतीत बॅनरची चर्चा! शरद पवार यांनी सांगूनही सुनेत्रा पवार यांनी नाही ऐकलं…

baramati-election
Share

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर ज्येष्ठ नेते शरद पवारांचा फोटो छापण्यात आला आहे. विलिनिकरणाच्या चर्चा थांबलेल्या आहेत, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत असताना सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीने शरद पवार यांचा फोटो वापरल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ पाहत आहेत का? अशी चर्चाही सुरू झाली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू आहे. या लढाईत पक्ष फुटीनंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी शरद पवारांचा फोटो वापरून निवडणुकीत मतं मागू शकतात आणि लोकांमधे संभ्रम निर्माण करू शकतात अशी निवडणूक आयोगात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तक्रार केली होती. श प गटाच्या तक्रारीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरण्यास सुरुवात झाली होती. मात्र अडीच वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचा फोटो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बॅनरवर वापरण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र गेल्या तीन वर्षांपूर्वी निर्माण झाले होते परंतु दोन्ही बड्या नेत्यांच्या प्रगल्भ नजरेने हे चित्र संपुष्टात आणून विलिनिकरण करण्याचे ठरवले. परंतु अजित पवार यांच्या माघारी काही कारणांनी विलिनिकरण होणार नाही, अशी सद्यस्थिती आहे. दोन्ही राष्ट्रवादीदरम्यान न्यायालयीन संघर्ष सुरू असताना या सगळ्यात शरद पवार यांचा फोटो अजित पवार यांच्या पक्षाने वापरू नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीच्या बॅनरवर ते ही भाजप नेत्यांच्या रांगेत शरद पवार यांचा फोटो झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर निवडणुकीत 23 उमेदवारांचे आव्हान…

Video: पार्थ पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून शपथ! पण कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे…

शरद पवार यांचे बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान…

अजित पवार यांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या…

बारामतीत रणशिंग! अजित पवार यांचा वारसा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *