सोलापूर : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू असताना त्यामध्ये आता ट्विस्ट आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचे ते म्हणाले. दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
बारामतीत जाऊन निवडणुकीसंदर्भात सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. कार्यकर्त्यांसोबत व्यापक बैठक घेऊन निवडणूक लढवायची का आणि कोणी लढवायची याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असे लक्ष्मण हाके यांनी जाहीर केले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
लक्ष्मण हाके म्हणाले, ‘बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेलं अहिल्यादेवींचे नाव बदलण्याचा जीआर हे शासन काढू शकतं, आम्ही ते कधीही सहन करणार नाही. ओबीसींचे कोणतेच प्रश्न स्वर्गीय अजितदादा किंवा या सरकारने सोडवले नाहीत, आमची कोणतीही मागणी मान्य केली नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असेल किंवा होस्टेल असेल असे अनेक विषयांसाठी आम्ही झगडत होतो मात्र त्याला न्याय कधीच मिळाला नाही. लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणे चुकीचं आहे. दादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का? दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे शपथविधी करतात. आजोबा, नातू अधिवेशनाला निघून जातात. मग दुःख फक्त आम्ही करायचे का?’
आमच्या ओबीसी समाजाचे आरक्षण एका बाजूला संपवून टाकण्यात आलं आहे. आमचे सर्व प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. अशावेळी अन्यायाला वाचा फोडायला निवडणुकीसारखा दुसरा कोणता पर्याय आहे का? असा सवाल हाके यांनी केला. सुप्रिया सुळे जर प्रोफेशनल राजकारण करत असतील तर आम्हीही तसे करू, असेही हाके म्हणाले.
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर; पाहा निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक…
तुम्ही पालकमंत्री म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाहीत; गिरीश महाजन प्रकरणावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री! मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की…