इंदुरीकर महाराज म्हणाले, मुलगी ही दरिद्री मुलाच्याच नादाला लागते अन्…

indurikar-maharaj
Share

अकोला : मुलगी हुशार मुलावर कधीही प्रेम करत नाही, ती कधीही चांगल्या मुलाच्या नादी लागत नाही. मुलगी ही दरिद्री मुलाच्याच नादाला लागते, त्याच्यावरच प्रेम व्यक्त करते. विहिरीवरच्या मोटारी चोरणारे, गाड्यांचे पार्ट चोरतो अशा मुलांच्या मागे मुली लागतात. एखादी मुलगी दरिद्री मुलाबरोबर पळून गेली तर ती आयुष्यात कधीही सुखी होत नाही. तिने सुखी असल्याचं सांगावं, मी तिच्या घरी सहा महिने भांडी घासतो. जिने आई-बापाची मान खाली केली ती मुलगी आयुष्यात कधीही सुखी होत नाही, असे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘बारावी आणि दहावीची परीक्षा तोंडावर आल्या आहेत. मुले काहीच अभ्यास करेनात. राज्यातील सर्व शाळांत परीक्षा काळात मोबाईलवर बंदी घालावी. मी दीड वर्षे शेती करून पाहिली, काहीही खरं नाही. इतर काहीही करा, पण भाजी आणि किराणा वरच्यावर भरता येईल असं काहीतरी करा. आजकाल शाळेतली पोरं रम्मी खेळून भिकारी झाले आहेत. पोरं अभ्यास करणारे नाही. अभ्यास हा विषय त्यांनी सोडून दिला. परीक्षा आली की खिडकीतून चिठ्ठी येते.’

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

पोरांनो, मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका, तुमचा वापर फक्त ‘यूज आणि थ्रो’साठी होतोय. आज प्रत्येक कामामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. आजकाल पेनमध्ये कॅमेरे आहेत. टपरी पेटवाताना किंवा दंगलीत तुम्ही कुठे दिसले तर, 10 वर्षांची शिक्षा आहे. कारण, आतापर्यत दंगलीमध्ये गरिबांची पोरं आत गेली आहेत, मोठ्या श्रीमंतांची पोरं नाहीत आणि ते कधी जाऊ देणारही नाहीत. ते तुमचा वापर फक्त ‘युज अँड थ्रो’ म्हणून करणार. आज कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. म्हणून सर्व पोरांच्या पाया पडतो, दंगलीच्या भानगडीत पडू नका, असेही इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

मी काहीही केलं तर लोक शिव्या देतात, मी फक्त सत्य बोलतो तरी लोक टीका करतात. 31 वर्षे आयुष्य लोकांच्या शिव्या खाण्यात गेलंय, मग थोड्यासाठी कशाला बंद करायचं असं म्हणत यापुढेही आपण कीर्तन सुरू ठेवणार असल्याचे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

इंदुरीकर महाराज नवीन व्हिडीओमध्ये म्हणाले; काय बोंबलायचंय बोंबला, आता तर…

इंदुरीकर महाराज ट्रोलिंगने हैराण; कीर्तन सोडण्याचा निर्णय…

Video: इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा थाटात साखरपुडा, काय करतो होणारा जावई, नेटीझन्सची टीका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *