फ्लाईट अटेंडंट पिंकीचा ‘मिस कॉल’ वडिलांसाठी ठरला आयुष्यभराचं दुःख…

ajit pawar pinki mali
Share

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असलेल्या फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी (वय २९) यांचाही विमान अपघातात बुधवारी (ता. २८) मृत्यू झाला आहे. “विमानात बसल्यावर अजितदादांशी तुमचं बोलणं करून देईन,” हा पिंकीने आपल्या वडिलांना दिलेला शब्द आता कधीच पूर्ण होणार नाही, या विचाराने माळी कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडले आहे.

पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे वरळी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते. मात्र, पक्षात सुरू असलेल्या काही घडामोडींमुळे ते अस्वस्थ होते. दादांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत असताना पिंकीने ही बाब अजित पवार यांच्या कानावर घातली. दादांनीही या साध्या कार्यकर्त्याची दखल घेत तातडीने आपल्या स्वीय सहायकामार्फत शिवकुमार यांना फोन लावला होता.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दादांचा फोन आला, तेव्हा शिवकुमार गाडी चालवत असल्याने तो उचलू शकले नाहीत. त्यानंतर दादांनी त्यांना मेसेज केला “मुंबईत आल्यावर नक्की भेटू!” पण मुंबईत परतण्यापूर्वीच बारामतीच्या धावपट्टीवर विमान अपघात झाला आणि दादा आणि पिंकी या दोघांनाही जीव गमवावा लागला. “दादा आणि पिंकी दोघांनीही आपला शब्द पाळला नाही,” असे सांगताना शिवकुमार माळी यांचे अश्रू अनावर होत होते.

दरम्यान, पिंकी माळी गेल्या आठ वर्षांपासून एअर हॉस्टेस म्हणून काम करत होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्या अजितदादांच्या दौऱ्यावर सोबत होत्या. सकाळी उड्डाणापूर्वी त्यांनी आपल्या भावाशी संवाद साधला होता, तोच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. दौरा संपवून त्या नांदेडला आपल्या गावी जाणार होत्या, पण त्याआधीच अपघाती मृत्यू झाला. “माझी लेक गेली याचं दुःख तर डोंगराएवढं आहेच, पण ज्या नेत्यासाठी आम्ही आयुष्य वेचलं, तो राज्याचा धडाडीचा नेताही आम्ही गमावला,” अशा शब्दांत शिवकुमार माळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

विमानात बसण्यापूर्वी अजितदादा यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांना शेवटचा फोन; म्हणाले…

Video: पाणावलेले डोळे, आवंढा गिळत शरद पवार पुतण्याबद्दल म्हणाले, अजित…

अजित पवार यांची घड्याळावरुन पटली ओळख; थरारक कहाणी…

अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…

हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…

विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *