मुंबईः गुन्हेगारांना सोडणार नाही, टायरमध्ये घाला अशा जाहीर वल्गना करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये मात्र महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व तत्त्व बाजूला ठेवून चक्क गुंडांच्या टोळ्यांमध्ये तिकीट वाटप केले आहे.
पुणे शहरातील आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 23 मधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या दोघीसुद्धा जेलमधून निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे गुंड गजा मारणेच्या पत्नीला सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही घराण्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास असतानाही अजित पवार यांनी उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारीमुक्तीची स्वप्ने पाहणाऱ्या ‘पालकमंत्री’ अजित पवार यांना आता या उमेदवारी कशा चालतात? अशा चर्चा सुरू आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
मुंबईमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मुंबई मनपासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जवळपास 96 उमेदवार उतरवण्यात आले आहेत. शिंदे सेनेकडून 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 11 उत्तर भारतीय, मराठी 56, मुस्लिम 23, ख्रिश्चन तीन, तेलगू एक, तमिळ एक आणि बोहरा मुस्लिम एक समीकरण आहे. पक्षाकडून 50 महिला उमेदवारांना तर 46 पुरुष उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एससी प्रवर्गातून 12 उमेदवार आहेत, तर ओबीसी मधून 17 उमेदवार आहेत.
चर्चांना उधाण! कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला अजित पवार गटाकडून उमेदवारी…
मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पाहा कोणाला किती जागा…
पुणे! गुंड बंडू आंदेकर याने जेलमधून बाहेर येऊन भरला अर्ज अन् हात उंचावत म्हणाला…