पार्थ पवार यांच्या सख्ख्या भावाचे परदेशात लग्न अन् दुसरीकडे अटकेची टांगती तलवार…

parth-ajit-pawar
Share

पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कॉमेडी कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच दिवसांपूर्वीच दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. 2 डिसेंबर रोजी दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

आर्थिक गुन्हे शाखेने दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यास मी हजर राहीन, असे दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना सांगितले. मात्र सध्या मला परदेशात जय पवार यांच्या लग्नाला जायचे असल्याने, लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन, असेही दिग्विजय पाटील यांनी स्पष्ट केले. दिग्विजय पाटील यांच्या चौकशीदरम्यान अनेक मुद्द्यांची तपासणी झाल्याने, आता पार्थ पवार यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचा परदेशात म्हणजे बहारिन येथे शानदार लग्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे मुंढवा जमीन प्रकरणात जय पवारांचे सख्खे बंधू पार्थ पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दिग्विजय पाटील यांच्यावरही जमीन प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुसरीकडे शीतल तेजवानीला याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होणार का असा सवाल आहे. त्यातच अमेडिया कंपनीची 99 टक्के भागिदारी असलेले पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पार्थ पवार यांना अडकवणारा अजित पवार गटाचा नेता कोण? थेट नावच घेतले…

पार्थ पवार जमिनीप्रकरणात अंजंली दमानिया करणार मोठा गौप्यस्फोट…

पार्थ पवार प्रकरण! थोरल्याच्या प्रतापाने धाकट्यावर अन्याय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *