जालना : मला पोलिस संरक्षण नको मला दिलेले पोलिस संरक्षण तात्काळ काढावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पोलिस अधीक्षकांना अर्ज दिला आहे. या कटाच्या मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
मंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे एकमेकांवर थेट टीका करताना दिसत आहेत. मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांत उघड संघर्ष पाहायला मिळाला. आता मनोज जरांगे यांनी त्यांना देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कला आहे. त्यामुळे स्वतःचे पोलिस संरक्षण नाकारत, आपले संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. आज जालन्यात पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे मनोज जरंगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्जाद्वारे ही विनंती केली आहे.
जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, पोलिस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. माझ्या घातपाताचा कट रचणारा धनंजय मुंडेच आहे. या कटाच्या मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. मला पोलिस संरक्षण नको मला दिलेलं पोलिस संरक्षण तात्काळ काढावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पोलिस अधीक्षकांना अर्ज दिला आहे.
मनोज जरांगे नार्को टेस्टसाठी तयार, धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान…
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप…
मनोज जरांगे यांचा मोठा गौप्यस्फोट; धनंजय मुंडेंकडून हत्येचा कट…