राजू शेट्टी यांचे चक्काजाम आंदोलन स्थगित; ठरला फॉर्म्युला…

raju-shetti
Share

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊसाच्या दरावरून पुकारलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. तब्बल 61 तासानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय किणी टोल नाका इथे जाहीर केला. त्याचप्रमाणे उद्याचा बंद देखील स्थगित केल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले.

ऊसाला पहिली उचल 3900 सह साखर हंगाम 100 रुपये आणि साखरेचे दर वाढल्यानंतर अधिकचे दोनशे रुपये देण्याचा तोडगा कारखानदारांकडून मान्य करण्यात आला. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या 4200 रुपयांच्या मागणीला यश मिळाले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊसाच्या दरावरून पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर सुरू असलेले 61 तासांचे चक्काजाम आंदोलन मध्यरात्री स्थगित करण्याच्या जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी दिलेल्या सुधारित दराचा प्रस्ताव मान्य केल्यानंतर राजू शेट्टी यांच्याकडून आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुटली असून तीन दिवसानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. मध्यरात्री 1 वाजता राजू शेट्टी यांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील किणी टोलनाक्यावरील आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महामार्ग रोखून धरला. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगल्या. यामुळे ऐन दिवाळीत एसटीची वाहतूक सेवाही कोलमडली. कोल्हापुरातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल 166 एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पण अखेर हे आंदोलन थांबले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!