शिर्डी: राज्यावर सध्या दुष्काळाचे सावट गंभीर होत चालले असून, अशा कठीण परिस्थितीत लग्नसमारंभातील अनावश्यक डामडौल आणि उधळपट्टी पूर्णपणे टाळायला हवी, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले आहे. त्यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांना साधेपणाने लग्नसमारंभ करण्याचे हात जोडून आवाहन केले.
लग्नातील वाढत्या खर्चावर बोचरी टीका करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “कोविडच्या काळात लग्न कसे झाले? 10 लोकांत लग्न झाले, 50 लोकात लग्न झाले. त्यांना पोरं झाली नाहीत का? ” असा थेट सवाल त्यांनी मंचावरून उपस्थित केला. समाजात दाखवला जाणारा खोटा मोठेपणा आणि भव्य सोहळ्यांची परंपरा यावर त्यांनी कडक शब्दांत बोट ठेवले. मला वाटतं आता पुन्हा सामुदायिक विवाहाकडे जायची वेळ आलेली आहे. माझी कार्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की, आता हे सगळे डामडौल बंद करा. परिस्थिती अडचणीची आहे. उत्पन्नाचे साधन काय शिल्लक राहणार? जर पाऊस पाणीच नाहीये. त्यामुळे साखरपुडा, हळदी, लग्न… एक दिवस साखरपुडा हळद करायची आणि दुसऱ्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम… कोविडच्या काळात लग्न कसे झाले? 10 लोकांत लग्न झाले, 50 लोकांत लग्न झाले. त्यांना पोरं झाली नाहीत का? मला कळत नाही, डामडौल का आलं पाहिजे? मोठेपणाचं सोंग आपल्याला मिरवायचं आहे ते कृपया या वर्षी तरी थांबवा, अशी माझी विनंती आहे.’
View this post on Instagram
दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्य सरकारने भूमिका घेतली , कर्जमाफी असो किंवा दुष्काळात मदत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविडमध्ये माणसं उद्ध्वस्त झाली. मात्र मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या बांदावर गेले आणि तातडीने पहिल्या ट्रिगरला 200 हून अधिक तालुके जाहीर झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 च्या 14 तालुक्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
राज्यात दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना काय काय मिळणार? राज्य सरकारकडून यादीच जाहीर…
स्वीडनमध्ये खासदार झालेल्या नीला विखे यांचा काका-चुलत भावाला टोला; म्हणाल्या…