पुणे (सुनिल सांबारे): न्यू एज्युकेशन सोसायटी, पुणे चे अध्यक्ष, क्रीडा विभागाचे माजी सहाय्यक संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा विविध सामाजिक संस्थांवर सक्रियपणे कार्यरत असलेले, विशेष कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम ऊर्फ सुधाकर विनायक भिंगारकर (वय ९०) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले.
शिक्षण, क्रीडा, सामाजिक बांधिलकी आणि समाजहितासाठी त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टी, प्रसंगावधान आणि समयसूचकतेमुळे त्यांनी अनेकांच्या आयुष्यात प्रेरणादायी ठसा उमटवला. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा समाजावर दीर्घकाळ प्रभाव राहील. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा तसेच नातू-नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!