पुणे : आजपर्यंत साहित्यातील विविध प्रकारांनी समाजमन घडवण्याचा, समाजमन बदलण्याचा राजसत्ता उलथून टाकण्याचा असा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांचा यशस्वीरित्या अंगिकार केला आहे. वल्लरी मीडिया आणि समर्थ फाउंडेशन यांनी प्रस्तूत केलेल्या ‘स्वर मोगरा’ या म्युझिक अल्बमच्या लोकार्पण सोहळ्यात मेधा कुलकर्णी बोलत होत्या.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘चांगलं लेखन करा. प्रसिद्ध करण्याची घाई करू नका. कवी श्रेष्ठ की गीतकार हा वाद पूर्वी होत होता. मात्र कविता सर्वांना समजते असं नाही; पण गीताच्या माध्यमातून ताल, सूरांसह संगीताचा साज चढल्याने अवघड कल्पना सोप्या होतात आणि मनात रूंजी घालतात. म्हणून गीतकारांनाही तेवढंच महत्व आहे’.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, ‘समर्थ फाउंडेशन’चे किरण इनामदार, वल्लरी मीडियाच्या आरती परळकर, माया कल्याणकर, व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते. ‘स्वर मोगरा’मध्ये एकूण बारा गीतकारांच्या गीतांचा समावेश आहे. त्यामध्ये स्वरा चव्हाण, मधुरा पिंपळकर, अर्चना काचरे, शुभांगी उदगावकर-पाठक, सुधीर दाते, श्रीराम टिळक, मंजुषा चित्रिवेकर, नीलिमा कुलकर्णी, अभिजित जगताप, रुपाली इनामदार, दीपा केळकर, अनुपमा भंडारी अशा बारा गीतकारांच्या गीतांचा समावेश आहे.
यावेळी संग्राम जगताप आणि आरती परळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील धनगर यांनी केले.
उत्तम साहित्यनिर्मितीसाठी मनाची मशागत आवश्यक : स्वाती महाळंक
प्रतिभावंत कवींना प्रोत्साहित करणे गरजेचे : चंद्रकांत वानखेडे