नवी दिल्लीः भारत सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सीबीएफसी) तात्काळ प्रभावाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्रचना केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी, सिनेमॅटोग्राफ कायदा, १९५२ आणि सिनेमॅटोग्राफ (प्रमाणन) नियम, २०२४ अंतर्गत ही अधिसूचना जारी केली.
नवीन सीबीएफसी सदस्य
पुनर्गठित मंडळात १८ सदस्य आहेत. त्यात विनोद अनुपम, मनोज जोशी, अभिषेक जैन, रिकी केज, प्रियदर्शन, सुनील शेट्टी, हंसराज हंस, सुप्रिया यारलागड्डा, यतींद्र मिश्रा, रूपाली गांगुली, प्रीती झिंटा, नीला माधव पांडा, पंकज त्रिपाठी, प्रोसेनजीत चॅटर्जी, पल्लवी जोशी, निशिगंधा वाड, वामन केंद्रे आणि रमेश पटांगे यांचा समावेश आहे.