राजकीय नेत्याला धमकी; घराच्या बाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन…

political-leader
Share

ठाणे : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा कॉल आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “घराच्या बाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन”, असा कॉल करण्यात आला. रविवार काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने हा कॉल केला होता. आव्हाड यांनी संबंधित धमकीच्या कॉलची तक्रार पोलिसांना दिली आहे. तसेच, संबंधित व्यक्तीचा व्हॉट्सअप मेसेजही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला सुदैवाने तो बचावला आहे. मात्र, या हल्ल्यानंतर मुंबई बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. अभिनेत्यांना सातत्याने येणाऱ्या धमक्यांवरुन चित्रपटसृष्टीत भीती पसरली आहे. त्यातच, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी एक मोबाईल नंबर शेअर करत, 7038841820 ह्या इसमानी 2/3 वेळा मला फोन केला, भ्रमणध्वनीवर अर्वाच्या भाषेत बोलून मारण्याची धमकी दिली. हे आत्ता 4.30 पासून सुरू होते, तो इसम माझ्या घराच्या दरवाजावर उभा असल्याचं बोलत होता, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. विशेष म्हणजे, आव्हाड यांना फोन करुन धमकी दिल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित फोन नंबरवर कॉल केला, त्यावेळी त्यांना देखील मारुन टाकायची धमकी त्याच व्यक्तीने दिली. “आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला पण गोळ्या घालेन” घरच्या बाहेर येऊन गेलो, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यावरुन, हेमंत वाणी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, जितेंद्र आव्हाड विद्यमान आमदार असून हे पुरोगामी विचारांचे प्रसारक आहेत. यापूर्वी देखील त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांना धमकी देण्यामागचं कारण काय आहे, अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे, ही धमकी राजकीय हेतूने प्रेरित आहे की, वेगळं काही हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल. याप्रकरणी, अद्याप पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतल्याची माहिती नाही.

टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या आरोपींची ओळख पटली; सूत्रधारांचाही शोध घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे : उद्धव ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!