फिलीपीन्समधील आसिआन शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीची शक्यता

Share

नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १६ नोव्हेंबर रोजी आसिआन शिखर परिषदेसाठी मनिला येथे जाणार असल्याची पुष्टी, व्हाईट हाऊस आणि फिलीपीन्सने केली आहे. यामुळे आसिआनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीची शक्यता वाढली आहे. मोदीदेखील या शिखर परिषदेसाठी मनिला येथे जाण्याची शक्यता आहे, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीचा कोणताही औपचारिक प्रस्ताव अद्याप आलेला नाही, परंतु अधिकृत सूत्रांच्या मते, द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चेतील कोंडी फोडण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात या काळात होणारी भेट अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मते, दोन्ही पक्ष तोडगा काढण्याच्या जवळ पोचले आहेत. प्रमुख मुद्दे सोडवण्यात आल्याने लवकरच करार होईल, असा विश्वास अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी व्यक्त केला आहे. या वर्षी फ्रान्समध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेदरम्यान या दोन नेत्यांची शेवटची भेट झाली होती.

चीनमधील एपेक शिखर परिषदेसाठी जात असताना ट्रम्प मनिला येथे थांबणार आहेत. मनिलामध्ये ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे तिथे क्वाड शिखर परिषद होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षां ‘क्वाड’ नेत्यांची शिखर परिषद लवकरच आयोजित करण्यासाठी हे चारही देश परस्परांच्या संपर्कात आहेत. जर मनिलामध्ये ‘क्वाड’ शिखर परिषद होऊ शकली नाही, तर डिसेंबरमध्ये फ्लोरिडा येथे होणाऱ्या जी २० परिषदेदरम्यान ती आयोजित करण्याची ट्रम्प यांना संधी मिळेल. या महिन्याच्या अखेरीस अटलांटा येथे होणाऱ्या जी २० परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान क्वाड देशांचे परराष्ट्रमंत्र्यांचीही बैठक अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!