नागपूर : ‘मंत्र्याची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते. त्याची उपाधी मला दिली गेली आहे. तर गरब्यामध्ये लव्ह जिहाद सारखा प्रकार होऊ नये, याकरिता मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको, अशी मागणी होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नागपूरमध्ये आयोजित दहीहंडी महोत्सवाबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘आपल्या धर्मात वेगवेगळे रंग आहे. जगात सगळ्यात जास्त ख्रिश्चन धर्माला मानलं जातं. ते लोक सर्व धर्माच्या लोकांचा समावेश आपल्या उत्सवात करतात. नवीन वर्षाचे ख्रिसमस असो त्यांनी लोकांना सेलिब्रेट करायला लावले. त्याच पध्दतीने हिंदू धर्मात व्हावे. आपले सुद्धा दहीहंडी, नवरात्र, गरबा हे चांगले सण आहेत. कोणी श्रद्धेने, कोणत्याही जातीचा श्रद्धेने त्या ठिकाणी येत असेल आणि अडचणी निर्माण करत नसेल. कुटुंबासोबत विश्वासाचा टिळा लावून येत, असेल तर त्याला येऊ द्यावे..’

मुन्ना यादव यांनी दहीहंडीचा कार्यक्रमाचं आयोजन केल आहे. या ठिकाणी स्त्रिया सुद्धा मनोरा लावणार आहे. पुरुषसुद्धा दहीहांडीमध्ये सहभागी होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळं छान वाटतं आहे. ही भूमिका पार्शली काही लोकांनी घेतली असेल काही तशी लव जिहाद यासारखी काही कारण असेल. पण याचा आपल्याला लॉंग टर्म विचार करावा लागेल. तसे कायदे कठोर करावे लागतील. आपल्या मुलीला वेद, पुराण, महाभारत यांना माहित आहे. स्वतःच्या धर्मावर त्यांचा विश्वास आहे का? त्यांना स्वतःचा धर्मावर गर्व आहे का? मग अशा केसेस कमी होतील किंवा हळूहळू या केसेस होणार नाही, अशी प्रतिक्रिया देखील अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
दहीहंडीचा उत्सव होता या ठिकाणी स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी मनोरा लावून दहीहांडी कार्यक्रम होतो आहे. एक बॅलन्स साधत आहे. मात्र काही ठिकाणी पुरुष मनोरा बनवतात तर दुसरीकडे महिलाकडून डान्स करायला लावतात. ते पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. स्त्री पुरुष समानता ठेवा. पबमध्ये जातात तेव्हा तुम्ही नाच करता. इथे मनोरा बनवता तेव्हा सगळे मनोरा गरबा खेळता तेव्हा सगळे गरबा असेल तर मनोराच बनवा. महिलांकडून डान्स करून का घेता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याबाबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी जरांगे पाटील ते माझे भाऊ आहेत, त्यांना मी घरी जेवायला यायचे निमंत्रण देते असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केले तोंडभरून कौतक…