राजकारणातील चर्चांना उधाण अन् अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया…

Share

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे तिघेही एका कार्यक्रमानिमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात एकाच मंचावर एकत्र आले होते. मंचावर येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिन्ही नेत्यांमध्ये ग्रीन रूममध्ये काही वेळ बंद दाराआड चर्चाही झाली. यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते.

राजकारणात एकमेकांवर कडाडून टीका करणारे हे तीन नेते एकाच व्यासपीठावर आल्याने त्यांच्यातील संवाद आणि राजकीय टोलेबाजीची मोठी चर्चा पाहायला मिळाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची एकच चर्चा रंगली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात शत्रूत्व नसतं, दोन वेगळ्या विचारधारा असतात. वैयक्तीक पातळीवर आपण शत्रू मानले नाही पाहिजे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

‘महाराष्ट्राची हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा छान कार्यक्रम होता, व्यंगचित्रकारांचा कार्यक्रम होता, आम्ही तिघेही साहित्य प्रेमी म्हणून गेलो होतो, तिथे जी भाषणे झाली ती लाईटर अशा प्रकारची होती, यातून महाराष्ट्राचे संस्कृती पाहायला मिळते विचार काही असले तरी, विचारामध्ये काही अंतर असलं तरीही राजकीय टीका करत असलो तरी, अशा कार्यक्रमांना एकत्रित आम्ही येऊ शकतो ही संस्कृती महाराष्ट्र अपेक्षित आहे. कुठलाही वेगळा राजकीय अर्थ काढायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी संबंधित काही जुन्या आठवणी सांगितल्या. 2019 पूर्वी उद्धव ठाकरे यांचा फोन आला की आपण त्यांना भेटण्यासाठी जात होतो. मात्र, 2019 नंतर उद्धव ठाकरे यांचा फोन येईल, याची आपण वाट पाहत राहिलो, पण त्यांचा फोन आला नाही, अशा आशयाचं मिश्किल वक्तव्य फडणवीस यांनी केले. राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेचा उल्लेख करताना, त्यांनी आपलं व्यंगचित्र काढताना पोट मोठं दाखवण्याऐवजी नाक किंवा कान मोठे दाखवावेत, अशी विनंती पूर्वी केल्याची आठवणही सांगितली. राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत, तर उद्धव ठाकरे यांना छायाचित्रणाची आवड आहे. त्यामुळे या दोघांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावं आणि राजकारण आपल्यावर सोपवावं, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.

…म्हणून मी सगळ्यात जास्त ट्रोल होते : अमृता फडणवीस

हिंदूंच्या उत्सवांमध्ये कोणी गैरधर्मिय विश्वासाने येत असेल, तर त्याला येऊ द्यावेः अमृता फडणवीस यांचे मत

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केले तोंडभरून कौतक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!